श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज च्या व्दितीय वर्धापनदिनानिमित्त ह.भ.प.पुरूषोत्तम पाटील बुलढाणेकर महाराज यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन


नांदेड जिल्हा प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे

कंधार तालुक्यातील पेठवडज येथील श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज च्या व्दितीय वर्धापनदिनानिमित्त आणि सोसायटीचे तांत्रिक सल्लागार अशोकराव पाटील डावकोरे व सोसायटीच्या अध्यक्षा सौ. सुनीताबाई पाटील डावकोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ९ /११/२०२५ रविवार रोजी पेठवडज येथे सांयकाळी ८ ते १० या वेळेत श्री राम मंदिर परीसर श्री महादेव मंदिर प्रांगणात महाराष्ट्र राज्यातील नावाजलेले किर्तनकार पुरूषोत्तम पाटील बुलढाणेकर महाराज यांच्या मधुर वाणीतून भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीने पेठवडज च्या जनतेला दर्जेदार सेवा देत दोन वर्षे पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीमध्ये ट्रॅक्टरने नांगरटी मोफत पांदण रस्ते तयार करून दिले जातात, अनेक समाज उपयोगी कामे श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीच्या माध्यमातून सौ.सुनीताबाई अशोकराव डावकोरे यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सोसायटीचा फार मोठा आधार मिळाला असून यांचे नाव निश्चितच मानाचे स्थान निर्माण झाले आहे गावातील दुःखात अथवा सुखात दोन्ही प्रसंगी श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज येथील नागरिकाच्या खंबीरपणे पाठीमागे उभे राहून त्यांना मदत करीत आहे.दोन वर्षे केव्हा झाले जनसेवेत कळलेच नाही जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीचे तांत्रिक सल्लागार व अध्यक्षा सौ सुनीताबाई अशोकराव डावकोरे यांच्या माध्यमातून पेटवडजला खरा आधार मिळाला आहे.पेठवडज गावासाठी योगदान देणाऱ्या च्या यादीत मानाचे स्थान निर्माण झाले आहे. श्री.अशोकराव श्यामराव पाटील डावकोरे साहेब व सौ. सुनीताबाई अशोकराव डावकोरे यांचा वाढदिवस आणि श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज चा व्दितीय वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा पेठवडज व परीसरातील जनतेने हभप पुरूषोत्तम पाटील बुलढाणेकर महाराज यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज च्या वतीने कळविण्यात आले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!