कळमनुरी पोत्रा गावात राशन तक्रारींवर नागरिकांची बैठक; आठ दिवसांत समस्या सोडवण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आश्वासन


गाव.पोत्रा ,कळमनुरी:- कळमनुरी तालुक्यातील गाव.पोत्रा येथील राशन दुकानदार गोरगरिबांचे राशन संदर्भातील कोणतेही काम करत नव्हता , वेळेवर राशन देत नव्हता,नागरिकांशी आडमुटकी आणि उद्धट वागत होता त्यानंतर संबंधित समस्त नागरिकांनी संबंधित तक्रार वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला असता 

 

याबाबत सर्व माहिती व तक्रार कळमनुरी तहसील पुरवठा अधिकारी यांना केल्यानंतर 02 दिवसात जायमोका करू सांगितले होते, त्या अनुषंगाने आज दिनाक 09/06/2026 रोजी पोत्रा गावांमध्ये गावातील समस्त महिला व नागरिक यांची बैठक संपन्न झाली. 

 

या बैठकीमध्ये अनेक समस्या नागरिकांनी प्रशासनासमोर मांडल्या. राशन कार्ड संदर्भातील सर्व समस्या 08 दिवसांमध्ये दूर होतील तहसील पुरवठा अधिकारी यांनी शब्द दिला.

व यापुढे कोणतही घर राशनविना रिकाम राहणार नाही तसेच या संदर्भातील सर्व समस्या आता यापुढे वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून दूर होतील असा शब्द नागरिकांना दिला.

 

यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुकाध्यक्ष राजू कांबळे,युवा ता.अध्यक्ष मोहम्मद अस्लमभाई, युवा ता.महासचिव दिनेश पाईकराव, युवा कार्यकर्ते प्रशांत रणवीर,समाधान पाईकराव व गावातील समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!