शेळगाव येथील निळकंठ आनंदराव गुडपळे’ यांची महसूल सहाय्यक पदी निवड 


 

माहेमूद पिंजारी 

तालुका प्रतिनिधी देगलूर 

देगलूर : देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा निळकंठ आनंदराव गुडफळे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निवडीमुळे शेळगाव गावात आनंदीचे वातावरण असून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामान्य युवा वर्गाकडून त्यांचा अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे निळकंठ यांचा शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत गावातीलच जिल्हा परिषद शाळा मोजे शेळगाव येथे झाले व पाचवी ते दहावीपर्यंत विद्या विकास विद्यालय शेवाळा येथे झाले ग्रॅज्युएशन BCA ITM COLLEGE नांदेड येथे झाले आई-वडिलांच्या कष्टामुळे व त्यांच्या कठोर परिश्रमाच्या संघर्षातून घडलेले हे यश निश्चितच अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाचे शिखर गाठू शकतो, हे मान निळकंठ गुडपळे’ यांनी सिद्ध करून दाखवले उल्लेखनीय कामगिरीबद्दल गावकरी व मित्र परिवाराकडून अभिनंदन. व पुढील प्रशासकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या


Leave a Comment

error: Content is protected !!