
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना जिल्ह्यातील बाजी उम्रद परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावाच्या हद्दीत बिबट्या फिरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ परिसराला भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे, रात्री बाहेर न जाण्याचे आणि लहान मुले तसेच जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

वनविभागाकडून नागरिकांनी कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
