२१ वर्षीय सदाशिव होंडे बेपत्ता; परतूर पोलिसांकडे तक्रार दाखल – कुटुंबीयांची मदतीची विनंती


https://youtu.be/g_1v5oUd7qY

ता. परतूर | प्रतिनिधी – दिपक नाटभजन

परतूर तालुक्यातील सदाशिव होंडे (वय 21) हा युवक दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी (वार – सोमवार) घरातून बाहेर पडल्यापासून अद्यापपर्यंत परत आलेला नाही. कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

 

आजी नंदाबाई लहानू वरकड यांनी परतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात नमूद केले की, सदाशिव हा दुपारी सुमारे 2 वाजता कापूस वेचून घरी आला आणि “मित्राच्या हळदीला परतूरला जातो” असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो पुन्हा घरी परत आला नाही.

https://youtu.be/g_1v5oUd7qY?si=NCnr30zu0BEc6axj

अर्जाच्या आधारावर परतूर पोलीस ठाण्यात मिसिंग (हरवले) नोंद करण्यात आली असून, मा. मोंनी साहेब यांच्या आदेशानुसार पुढील तपासाची जबाबदारी सफौ/809 शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मिसिंग दाखल करणारे अधिकारी: पोहेक/1207 (मो. 9921251207)

तपास अधिकारी: सफौ/809 शिंदे (मो. 8007003401)

 

दरम्यान स्थानिक नागरिकांनीही शोध कार्यात मदत सुरू केली आहे. सदाशिव होंडे याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे:

 

📞 9049166763

📞 8806037743

📞 9637354210

📞 8080133542

कुटुंबीय व पोलिस प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “दिसल्यास तात्काळ संपर्क करा… ही नम्र विनंती.”


Leave a Comment

error: Content is protected !!