
ग्रामीण भागातून यशाची उंच झेप: जिद्द, परिश्रम आणि यशाचा अभिमान
अहमदनगर प्रतिनिधी सुनिल वाघमारे १४ मे
श्रीरामपूर / माळेवाडी
ग्रामीण भागातील अनेक अडचणी आणि मर्यादांवर मात करत, जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे माळेवाडीतील सुपुत्राने सिद्ध केले आहे. इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८८.८०% गुण मिळवून, कै. रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे विद्यालय, माळेवाडी. येथे द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या चि. स्वराज अण्णासाहेब मोहन याचा विद्यालयाच्या वतीने नुकताच भव्य गौरव करण्यात आला.
उत्साहात संपन्न झाला सत्कार सोहळा
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुंडलिक शिरोळे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला. स्वराजच्या या दैदीप्यमान यशाबद्दल मुख्याध्यापकांच्या हस्ते त्याला शाल, पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वराजचे अभिनंदन करत पूर्ण परिसर आनंदाने भारावून टाकला.

शिक्षकांकडून मिळाली कौतुकाची थाप.
कार्यक्रमात वर्गशिक्षक कुलकर्णी सर, गणित विषयाचे हाके सर, तसेच ठाकरे सर, थोरात सर, शिंदे सर आणि औताडे सर यांसह सर्व शिक्षक-शिक्षिकांनी स्वराजच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. गौतम चित्ते, तसेच युवा जिल्हामहासचिव सुनिल वाघमारे यांनीही कौतुकासह सत्कार केला.
सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि पालकांचे खंबीर सहकार्य या मुळेच स्वराजने हे यश मिळवले आहे, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्वराजचे वडील ॲड. अण्णासाहेब मोहन व आई सौ. सारिका मोहन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील संघर्षाची जोड देत स्वराजने मिळवलेल्या या यशामुळे पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. मुलाच्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला रामभाऊ औताडे पाटील, मोहम्मद भाई सय्यद, शिवाजी उबाळे, कार्तिक रहाटवाडे, कचरू मोहन, रावसाहेब मोहन, रविंद्र औताडे, शरद गलांडे, बद्रीनाथ रहाटवाडे, देविदास उंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सराला गावचे सरपंच शंकर विटेकर, सोसायटी माजी चेअरमन मथुराम पवार, प्रा. मोहन वमने सर, सुभाष उंदरे, रमेश दिवे, आप्पासाहेब मोहन, सचिन भसाळे यांनीही स्वराजचा वैयक्तिक सत्कार करून त्याच्या जिद्दीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमारी सांची मोहन, कुमारी सोनाली मोहन, सौ. अंजू मोहन, श्रीमती सत्यभामा मोहन व रू. बाबबाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. चि. स्वराज आणि त्याच्या कुटुंबीयांनी यावेळी शिक्षक, ग्रामस्थ आणि प्रत्यक्ष व फोनवरून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. स्वराजवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




