तालुका अध्यक्ष राजू कांबळे हल्ला प्रकरणी विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांची भेट; 26 फेब्रुवारीला VBA चा धरणे आंदोलना इशारा

नांदेड.हल्ला प्रकरणी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांची भेट,26 फेब्रुवारी 2026 रोजी धरणे आंदोलन…! कळमनुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयमध्ये शिरून अज्ञान व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता,सदरील घटनेला 10 दिवस उलटले असून सुद्धा हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून योग्य तो तपास केला गेला नसून अद्यापही हल्लेखोर फरार आहेत. हल्ला … Read more

सावळेश्वर बोगस जन्मनोंदणी थेट रांची झारखंड पासून कनेक्शन रांची (झारखंड) येथून पाच आरोपींना अटक

 नांदेड प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर.  कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे उघडकीस आलेल्या संशयास्पद जन्मनोंद प्रकरणाला आता ठोस वळण मिळाले आहे. उस्माननगर पोलिसांनी थेट रांची (झारखंड) येथे धाड टाकत चार पुरुष व एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे बनावट जन्मनोंदींच्या साखळीचा महत्त्वाचा द्वा पोलिसांच्या हाती लागला आहे.   प्रमाणिकपणे चौकशी करण्याचे आवाहन   सध्या … Read more

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

हिंगोली : कळमनुरी येथील विश्रामगृहासमोर (रेस्ट हाऊस) असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात घुसून, तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजू कांबळे हे थोडक्यात बचावले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.⋅ नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, राजू कांबळे हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात एकटेच … Read more

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

  लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. नेमकी घटना काय?   काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत … Read more

नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

नाशिक: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २१ (ड) च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया अहिरे यांच्या भावाला राजकीय सुडापोटी बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.  “तुम्ही अनुसूचित जातीचे लोक जनरल जागेवर कसे उभे राहू शकता?” असा जातीवाचक सवाल करत ही मारहाण … Read more

सावधान! तुम्ही पिताय ते दूध आहे की ‘पांढरं विष’? अंधेरीत दूध माफियांचा भयानक कारनामा उघड!

मुंबई : मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जिथे प्रत्येक गोष्ट शुद्ध मिळण्याचे आश्वासन दिले जाते, तिथे शुद्ध दूध मिळवणे आता सर्वसामान्यांसाठी एका मोठ्या संघर्षासारखे झाले आहे. अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात भेसळयुक्त दूध माफियांचा काळा धंदा जोमाने फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गोरखधंदा थेट लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या जिवाशी खेळत असून प्रशासनाचे याकडे … Read more

पूर्णत भीषण अपघात घोडज येथील पायी जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

पूर्णा-झिरो फाटा मार्गावर झाला अपघात अज्ञात वाहनचालक वाहनांसह फरार बातमी दार रुपेश कांबळे, कंधार:- कंधार तालुक्यातील घोडज येथील चंद्रकांत बाबाराव घोडजकर हे मजदूर असून त्यांना आई,भाऊ, बहीण असा परिवार आहे. या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावात दैनंदिन रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते दैनंदिन रोजगार मिळवण्याच्या शोधात, ठेकेदार माधव दिगंबर चव्हाण यांच्या सोबत बिहारला मंदिराच्या कामाला गेला … Read more

मोरे कुटुंबाची भेट; “न्यायासाठी पूर्ण ताकदीने सोबत राहू” — वंचित बहुजन आघाडी

आखाडा बाळापूर कळमनुरी पीडित मोरे कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी बजावणार…! आखाडा बाळापूर तालुका कळमनुरी येथील रहिवाशी मयत पंजाबराव मोरे यांची 30 नोव्हेंबर 2025 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या कारणास्तव आज मोरे कुंटुबांना वंचित बहुजन आघाडी मार्फत समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट दिली. यामध्ये पोलीस प्रशासन मुख्य आरोपींना बाजूला करून प्रकरण … Read more

नांदेड मधील आँचल ताटे हिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार.! मा. अंजली ताई आंबेडकर

नांदेड : आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी नांदेड येथे सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सक्षम ताटे हत्या प्रकरण अत्यंत क्रूर आहे, यातून जातीवादी मानसिकता दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ठामपणे कुटुंबियांच्या पाठीशी उभी आहे, असे अंजलीताई आंबेडकर यांनी सांत्वन करत विश्वास दिला नांदेड शहरात सक्षम ताटे … Read more

नांदेडमध्ये ‘ऑनर किलिंग’; प्रियकराची हत्या, प्रियसीने मृतदेहासोबत केले विवाह

नांदेड :प्रतिनिधी): प्रेमसंबंधांना विरोध करत मुलीच्या वडील व भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात समोर आली आहे. प्रियकराच्या हत्येनंतर प्रियसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह करत समाजाला हादरवणारा निर्णय घेतला. “माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले, पण ते हरले; माझा प्रियकर मरूनही जिंकला,” असे म्हणत प्रियसीने टाहो फोडला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, … Read more

error: Content is protected !!