मोरे कुटुंबाची भेट; “न्यायासाठी पूर्ण ताकदीने सोबत राहू” — वंचित बहुजन आघाडी


आखाडा बाळापूर कळमनुरी

पीडित मोरे कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी बजावणार…!

आखाडा बाळापूर तालुका कळमनुरी येथील रहिवाशी मयत पंजाबराव मोरे यांची 30 नोव्हेंबर 2025 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या कारणास्तव आज मोरे कुंटुबांना वंचित बहुजन आघाडी मार्फत समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट दिली.

यामध्ये पोलीस प्रशासन मुख्य आरोपींना बाजूला करून प्रकरण दडपण्याच काम करीत आहेत व आम्हाला तपासाबाबत काहीही सांगितल्या जात नाही , उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत. अशी पीडित मोरे कुटुंबाची परिस्थिती निर्माण झाल्याकारणाने त्यांच्या परिवाराची भेट घेत त्यांना धीर दिला व वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहे आणि जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास पुढाकार घेऊ व न्याय देण्याची भूमिका बजाऊ असे परिवारांना सांगण्यात आले.

पूर्ण बातमी पहा 👇

https://youtu.be/XjinS-iu7kE?si=fDUlK_zacD-lwM9

 

यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत नरवाडे ,सुभाष खाडे भगवान ढेपे,इम्रान पैलवान, संतोष इंगोले,करण नरवाडे, अमोल खंदारे , धम्मपाल पाईकराव ,मुकिंदा ढेपे जयभीम डोंगरे,विनोद ढेपे ,दादाराव खंदारे , शिवभूषण हाटेकर, तेजस खाडे,समाधान पाईकराव, अमोल पुंडगे व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!