वखारी (वडगाव), जि. जालना येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य बौद्ध कार्यक्रम उत्साहात संपन्न


 

 

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

ता. जि.जालना वखारी (वडगाव), —

दि. 5 नोव्हेंबर 2025  बुधवार रोजी वखारी (वडगाव) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य बौद्ध कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

 

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून पु.भ. भन्तेजी पटीशन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांचे धम्मोपदेश, आचार-विचार व समाजात मैत्रीभाव, समता आणि करुणेचा संदेश जपण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता पंचशील पठणाने झाली. त्यानंतर शांतिक बौद्ध भोजनदान, धम्मपूजन, धर्मदेशना आणि आराधना कार्यक्रम पार पडले. उपस्थित बौद्ध बांधवांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला.

 

या कार्यक्रमात परिसरातील धांडेगाव, मौजपुरी, पारेगाव, निरखेडा, दहिफळ, जळगाव, मानेगाव, बाजी उम्रद, सावंगी तलाव, बर्डी, उमरी व आसपासच्या गावांतील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे आयोजन समस्त बौद्ध उपासक/उपासिका व भिमसूर्य मित्र मंडळ, वखारी (वडगाव) यांच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक युवकांनी मोलाचे योगदान दिले.


Leave a Comment

error: Content is protected !!