
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे
इंदापुर : रुई च्या श्री बाबीर विद्यालय रुई येथील लिपिक श्री दत्तात्रय कुंडलिक काळे सर यांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली त्याबद्दल श्री बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी दत्तात्रय काळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, मागील दोन दिवसांपूर्वी श्री नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन या ठिकाणी शिक्षकेतर संघटनेची सहविचार सभा संपन्न झाली यावेळी बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्याचबरोबर सचिवपदी संपत धायगुडे, खजिनदार पदी सुखदेव वाघ, उपाध्यक्षपदी अनंता वाघमोडे तर सदस्य पदी हनुमंत मिसाळ,शिरीषकुमार नरुटे , संतोष दराडे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आहे. दरवर्षी शिक्षक केंद्र संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी होत असते आणि या अधिवेशनाला इंदापूर तालुक्यातून असंख्य शिक्षकेतर बांधव एकजुटीने नेण्याचे काम हे दत्तात्रय काळे सर अखंडपणे करत असल्याने आणि उत्तम सेवा आणि आपल्या शिक्षकेतर बांधवांच्या अडीअडचणी सोडवत असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यास आली आहे.