
प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे
लोहा, जि. नांदेड : जायकवाडी वसाहत पंचशील नगर, लोहा येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त खीर-भोजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला परिसरातील गावखेड्यांसह लोहा शहरातील बौद्ध उपासक-उपासिका तसेच लहान बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे खीर-भोजनाचा लाभ घेतला.

श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून बंधुभाव, एकजूट, स्वाभिमान आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमामुळे पंचशील नगर परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
“हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर स्वाभिमान, एकजूट आणि संघर्षातून मिळवलेल्या हक्काच्या जागेचा विजय आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ✊
कार्यक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.