उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महानगरपालिकेविरोधात भव्य जनआक्रोश महामोर्चा: सुजात आंबेडकर यांची उपस्थिती


 

उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेविरोधात भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेने शहरातील ३१ घरे आणि एका मशिदीला बेकायदेशीर नोटिसा दिल्यामुळे या कारवाईविरोधात हा महामोर्चा काढण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधित नोटिसा तातडीने रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत महामोर्चाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित झाले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!