बाल चित्रकला स्पर्धेत तब्बल 85 विद्यार्थ्यांचा सहभाग


प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे

इंदापूर : रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात काल घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने दरवर्षी बाल दिनानिमित्त राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जात असतात आणि या स्पर्धेमध्ये बाबीर विद्यालयाने तब्ब्ल 85 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला आहे.

तिसऱ्या गटामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी चे 60विद्यार्थी व चौथ्या गटामध्ये आठवी ते दहावीच्या 25 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील व पर्यवेक्षक धनाजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कला विभाग प्रमुख अमीन मुल्ला यांनी या स्पर्धेचे नियोजन केले.

  या स्पर्धा परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून सुनील दराडे,दादासो निटवे आणि दत्तात्रय जाधव यांनी काम पहिले .

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना 14 नोव्हेंबर 2026 रोजी समारंभ पूर्वक गौरवण्यात येणार आहे. यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, पोलीस पाटील अजितसिंह पाटील, सचिव विश्वजीत करे, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे सर्व शिक्षक -शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 


Leave a Comment

error: Content is protected !!