जालना प्रतिनिधी ; प्रदीप जाधव
जालना : जिल्ह्यातील सेवली सर्वाधिक लोकसंख्या व फार मोठी बाजारपेठ व दळण वळण असलेले मोठे गांव आहे म्हणून शासकीय निकषानुसार व निजाम कालीन हैद्राबाद दस्तावेज नोंदी नुसार सेवलीला अप्पर तहसील मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सेवली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर दिनांक १४ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने आंदोलन वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

यावेळी अप्पर तहसील यादीत सेवलीला डावल्या प्रकरणी स्थानिक आमदार बबनराव लोणीकर व शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महसूल प्रशासना मार्फत संभाजी नगर विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, ओबीसी नेते बबनराव मेहेत्रे, दिलीप बिबे, लक्ष्मण राठोड, संजय राठोड, दिलीप मगर गौतम मगर सर्जेराव सदावर्ते,शत्रुघ्न कोळी अनिल खाडे दत्ता खाडे, लखन सदावर्ते अरुण काकडे मुकुंद काळे सुनील काळे संतोष खाडे विकास सदावर्ते प्रकाश खाडे, बबन खाडे मदन डोके एकनाथ दसरथ डोके,करण डोके, रमेश डोके विकास काकडे रामभाऊ वाहुळे प्रविण मघाडे यांच्या सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यां आहेत.

