जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे – बौध्दाचार्य मनोज जमदाडे.


प्रतिनिधी, धम्मानंद कांबळे 

लोहा :जायकवाडी वसाहत येथील पंचरंगी ध्वज काढल्या प्रकरणी २३ जुन रोजीच्या तहसिल कार्यालयावरील वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आयु. मनोज जमदाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहती मध्ये मागील ३० वर्षा पासुन असलेला पंचरंगी ध्वज व विश्वशांती बोध्द विहाराच्या नियोजित जागेचा नाम फलक काही दिवसा पुर्वी अज्ञान समाज कंटकांनी रातोरात काढून टाकण्यात आला. यामुळे शहरात काही दिवस तनावाचे वातावरण होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदर – यांना निवेदन देवून पंचशिल ध्वज पुर्नस्थापीत करन्यासाठी पाच

 

दिवसाचा अल्टीमेटम दिला होता . पण त्यावर तहसिलदार यांनी कोनतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे २३ जुन रोजी तहसिल कार्यालयाावर जन आक्रेाश मोर्चा काढयाचे निवेदन दिले आहे.

या मोर्चाय वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सर्व सामाजिक संघटना, भिक्षू संघ सामिल असणार आहेत.

या मोर्चात नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!