बुद्धभूमी आंदोलनाचा ७वा दिवस; प्रशासनाची दखल कधी?


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

बुद्धभूमीच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. भन्ते गौतम रत्न महाथेरो तसेच बौद्ध अनुयायी प्रखर उन्हात आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

 

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मागण्या न्याय्य असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचेही लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले आहे.

भन्ते गौतम रत्न महाथेरो व बौद्ध अनुयायी उन्हात आंदोलनाला बसले आहेत; प्रशासनाला जाग कधी येणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधूनही उपस्थित केला जात असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!