ग्रामसभेने केलेल्या ठरावाच्या अंमल बजानीसाठी इंदापुर पंचायत समिति येथे बेमुदत धरणे आंदोलन


प्रतिनिधी : सागर लोंढे

पुणे इंदापुर येथील कालठन नंबर. १ या ठिकानी ओपन जिम उदवस्त केल्या प्रकरणी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार संबंदीत दोषी ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन आज इंदापुर पंचायत समिति येथे सुरु..*

दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत मॉडर्न स्कूल (डिजिटल शाळा) बांदकामासाठी १४ व्या वित्त आयोगातुन सुमारे २ ते २.५ लाख रुपए खर्च करुण बसवण्यात आलेल्या ओपन जिमचे साहित्य ग्रामपंचायतीचे प्रशास सो. आणी ग्रामसेवक सो यांची कोनतीही परवानगी न घेता परस्पर जेसीबीच्या सहाय्याने उव्द्स्त करुण शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करुण गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा ठराव एकमताने करण्यात आला होता.

 केलेल्या ठरावाची माहिती दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी आपल्या कार्यालयाकडे रितसर पत्र व्यवहार करुण याबाबत माहिती देण्यात आलेली असुन तरी देखील आपल्या कार्यालयाकडून आज पर्यंत याबाबत कोनतीही कारवाई करण्यात आलेली नसलेल्याने ठेकेदार मुजोरी करत आहे संमंदीत प्रकरणात आवाज उठवल्यामुळे (तक्रार केल्यामुळे ) आम्हाला हस्ते परहस्ते घातपात घडून आनण्याच्या धमक्या देत प्रकरणातुन बाजुला राहण्यासाठी आमच्यावर दबाव टाकत आहेत.

त्यामुळे संमंदीत ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज रोजी १८ जुन २०२६ पासुन पंचायत समिति इंदापुर या ठिकानी बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे दरम्यान च्या काळात माझ्यावर खोट्या केसेस साम दाम दंण्डाचा वापर करुण माझ्या जीवितास धोका होण्याचे नाकारता येत नाही असे काही घडल्यास त्यास उप. अभियंता मा शिवाजी राऊत सो, कनिष्ठ अभियंता मा. वसंत शेंडे सो. व संमंदीत ठेकेदार सह ठेकेदार हे सर्व जवाबदार असतील असे उपोषण स्थळी उपोषण करते सामाजिक कार्यकरते आयु.प्रमोदजी चव्हाण यांनी माहिती दिली या वेळी तालुक्यातुन विविध सामाजीक क्षेत्रातील तानाजी धोतरे, हनुमंत कांबळे, राहुल सोनावने,सचिन गायकवाड,तुषार भोसले,अमित चव्हाण,प्रताप शेंडगे,तानाजी पाडुळे, शिवाजी आहेर,पंकज बनसोडे या वेळी विविध राजकीय पक्ष संघटनांनी पाठींबा जाहीर केला.


Leave a Comment

error: Content is protected !!