अप्पर तहसील यादित सेवलीला डावल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी कडून धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन


जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, लक्ष्मण राठोड, दिलीप बिबे, भगवान मघाडे, मुकुंद काळे, शत्रुघ्न कोळी अनिल खाडे,सुनील काळे, संतोष खाडे, गौतम मगर, दिलीप मगर, एकनाथ डोके ,संतोष खाडे ,विकास सदावर्ते गणेश उबाळे प्रविण मघाडे यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!