राजेश तांगडे गट विकास अधिकारी भ्रष्टाचार विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे आंदोलन करण्यात आले


दिनांक ८/६/२०२६ रोजी जालना जिल्हा वंचित बहुजन आघाडी पूर्व चे वतीने छ. संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या सोबतच दुपारी ४:०० वाजता रास्ता रोको चे नियोजन करण्यात आले होते. पण पोलिस प्रशासन आणि आयुक्त कार्यालयाचे विनंती वरून रास्ता रोको तत्काळ विभागीय आयुक्त यांचेशी सिस्ट मंडळाशी चर्चा घडवून आणण्याचे मान्य करण्यात आल्याने स्थगित करण्यात आले.पोलिस प्रशासनाचे प्रयत्नाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा जालना पूर्व चे सिस्ट मंडळ व विभागीय उपायुक्त डॉ. मोकाटे,श्री पुरी,आणि रीता मेत्रेवार मॅडम यांच्या शी चर्चा समाधान कारक चर्चा घडवून आणली.

वंचित बहुजन आघाडी ने दिनांक २०/५/२०२६ चे निवेदन आणि त्या अनुषंगाने दिनांक ८/६/२०२६ रोजी धरणे व रास्ता रोको आंदोलनाचे जालना च नव्हे तर मराठवाड्यातील पूर्ण सीईओ ना आदेश काढून श्रेणी चे गटविकास अधिकारी याना पदभार देण्या बाबत आदेश काढा अश्या सूचना जी.श्रीकांत विभागीय आयुक्त यांनी उपायुक्त डॉ. मोकाटे यांना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्या साठी प्रपत्र ब मधे तक्रारींचा त्रेमासिक अवहाल वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त निवेदने आणि तक्रारीची चौकशी/शहानिशा करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आणि दोन्ही समित्यांनी प्रत्येक तिमाही संपल्यावर १० दिवसात अहवाल सादर करण्याचे सूचना काढण्यात आली आहे.निवेदनातील मुद्दे आधारित चौकशी अहवाल मागऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर संबंधितानी शिष्ट मंडळा ला दिले.आणि अधिकाऱ्यांच्या विनंती नुसार धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस प्रशासनाणे योग्य पद्धतीने काम करत चर्चा घडवून योग्य पद्धतीने प्रकरण हाताळले.आणि याप्रसंगी सहकार्यासाठी,मनपा नगरसेवक जावेद कुरेशी,वंचित चे जेस्ट नेते माणिकराव करवंजे,दिनेश साळवे,दिपक राऊत,भाऊराव गवई,अक्रम खान यांनी भेटी दिल्या, याप्रसंगी रामप्रसाद थोरात जिल्हा अध्यक्ष, परमेश्वरजी खरात जिल्हाऊपाध्यक्ष,जमीर शेख जिल्हा सचिव,हनुमंत मोरे तालुका अध्यक्ष किशोर तुपे,तालुका अध्यक्ष,सुभाष जाधव तालुका अध्यक्ष,चोखा नाना सौंदर्ये नामदेव नाचण,गणेश वैद्य,तारेक शेख,दिपक दवंडे,करण मोरे,गौतम खंडागले,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.या प्रसंगी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!