जालना: जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 29 मे 2026 रोजी जालना येथे एस.पी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी गाढे गव्हाण येथील गावगुंडांना स्थानिक आमदार व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्फत राजकीय द्वेषातून गावातील जातीयवादी गावगुंडा कडून दोन समाजात तेढ निर्माण करण्यात आली आहे तरीही यासंदर्भात मागील अनेक महिन्यांपासून टेंभुर्णी सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती व भोकरदन डि वाय एस पी यांच्या कडे वारंवार लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने जालना अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्फत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी व आंबेडकरी कार्यकर्ते यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणारे पी.एस.आय बाबासाहेब खार्डे यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी असे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे .

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने ,तालुकाध्यक्ष भानुदास साळवे,विजय सावंत,विलास सावंत,लंका सावंत, बबन सावंत,सुनिता सावंत,ज्ञानेश्वर हिवाळे,छाया हिवाळे राजू सावंत,विद्या सावंत,राहुल सावंत,संगीता सावंत,सदाशिव सावंत ,शीला सावंत,भगवान घोरपडे,सुबिद्रा घोरपडे,विष्णू सावंत,राजू दाभाडे,विजय दाभाडे,गंभीर सावंत ,अनिल हिवाळे,नितीन हिवाळे ,राधिका हिवाळे ,भगवान दाभाडे,रमेश हिवाळे,योगेश हिवाळे,वंदना सावंत ,मंदा हिवाळे,लताबाई सावंत,आनंद हिवाळे,समाधान हिवाळे,प्रल्हाद हिवाळे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





