89.60% गुण मिळवत निकिता जाधव विद्यालयात प्रथम


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनी निकिता तातेराव जाधव हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 89.60% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निकिता हिच्या यशाबद्दल ग्रामपंचायत वखारी तसेच ग्रामस्थांच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही ती असेच यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

निकिता हिच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात येत असून, तिच्या यशामुळे गावासह विद्यालयाचे नावही उज्ज्वल झाले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!