श्रीरामपूर (प्रतिनिधी)
नुकतेच टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा तथा जिल्हा निरीक्षक दिशाताई शेख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून या विधायक उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर तालुका. अध्यक्ष डॉ. गौतम चित्ते यांनी युवाआघाडीचे (जिल्हा महासचिव, सुनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. या कामी विलास अहिरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला.

रक्तदान साईसेवा ब्लड बँक (अहमदनगर) यांच्या सहकार्याने एकूण १५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच सिद्धी पॅरामेडिकलच्या वतीने नागरिकांची शुगर (मधुमेह) तपासणी करण्यात आली. अनेक गरजू नागरिकांनी नेत्र तपासणी सुविधेचा लाभ घेतला.
या उपक्रमासाठी अजित जगताप (साईसेवा ब्लड बँक टीम) आणि हरीश लुक्कड (सिद्धी पॅरामेडिकल टीम) यांचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभले. प्रमुख उपस्थिती मधे डॉ. सलीम शेख (बैतुसीफा क्लिनिक), इकबाल काक्कर, संतोष बनसोडे (भारतीय बौद्ध महासभा), विठ्ठल विघावे, यांच्या सह गौतम सुतार, राकेश सोज्वळ, राहुल गायकवाड, उसमा शेख, तसेच महिला आघाडीच्या रेखा बोरुडे, कंथाबाई वाघमारे, कांताबाई कदम, सुमन दुशिंग, भालेरावबाई, भीमाबाई उबाळे, नंदाबाई खरात, वैशाली हुसळे आदिंची उपस्थित लाभली.

राजकारणासोबतच समाजकारण करणे ही वंचित बहुजन आघाडीची संस्कृती आहे. जनतेच्या आरोग्यासाठी राबवलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
