*वाढदिवसानिमित्त विलासराव धुरंधर यांचे अभिष्टचिंतन


प्रतिनिधी :शेख हसन 

 वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय खामगाव येथे 

विलासराव धुरंधर तालूका संरक्षण उपाध्यक्ष खामगाव यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष आद.देवाभाऊ हिवराळे यांच्य प्रमुख उपस्थितीत हर्ष उल्हासात केक व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करून साजरा करण्यात आला.प्रसंगी डॉ अनिल एस वानखडे माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी विलासराव धुरंधर यांच्या 28 वर्ष कारकीर्दीचा गौरव करताना एकनिष्ठ व प्रामाणिक समता सैनिक दलाच्या सैनिकाच्या कार्याचे कौतुक केले व भविष्यात अशाच पद्धतीने भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल या स्वाभिमानी चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या विलासराव धुरंधर यांना आयु वर्ण बल आरोग्य मिळो अशा हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. तसेच भाई अजय गवई यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी वतीने शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला शहर अध्यक्ष आकाश सरदार, महासचिव, प्रशिक उमाळे, महासचिव,बबलू भाई कादरी, उपाध्यक्ष, संघपाल वाकोडे, शुभम हिवराळे, गजानन हिवराळे, धम्मापाल ससाने साहेब,भाईगणेश मोरे, भाईअजय गवई, सोनू खंडारे, शेख हसन, व संग्रामपूर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!