
कंधार प्रतिनिधी बळीराम कांबळे
जीवनात प्रमाणीकपणा हेच यशाचे गमक विश्वंभर पाटील
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता कंधार चे संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथील कार्यालयीन अधीक्षक मा श्री विश्वंभर जयवंतराव पाटील हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 30/4/2026 रोजी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवा स्फूर्तीचा गौरव सोहळा आशीर्वाद गार्डन मंगल कार्यालय दिग्रस बु येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या सर्व पाटील परिवारांची संबंधित पाहुणे आप्तेष्ट मित्रपरिवार आजी माजी विद्यार्थी स्नेही शिक्षण क्षेत्रातील शिक्षक प्रेमी पंचक्रोशीतील गावकरी पाटील परिवारातील सर्व सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेचे पूजन करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला अनेक मान्य वरानी विश्वंभर पाटील यांच्याशी आलेले जिवाळ्यांचे स्नेहपूर्ण क्षणांना उजळा दिला कुटुंबातील सदस्य सविता पाटील यांनी सेवा स्फूर्तीच्या शुभेच्छा देताना काकांनी आम्हाला सर्व मुला मुलींना दिलेले शिक्षण संस्कार हे आमच्यासाठी खूप मूल्यवान आहेत जीवन रुपी वाटचाल करताना काकांच्या संस्काराचा ठेवा आम्ही सदैव सोबत बाळगतो असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले किरण पाटील पंडागळे यांनी आपले वडील विश्वंभर पाटील यांच्या विषयीचा स्नेहभाव व्यक्त केला विश्वंभर पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्राध्यापक रवी पाटील यांनी आपल्या वडिलांची असणारे स्नेह भाव दिलेले संस्कार व विचारधारा यावर प्रकाश टाकला
मा श्री प्रा डॉ पुरुषोत्तम केशवराव धोंडगे साहेब यांनी सेवा स्फूर्तीच्या शुभेच्छा देताना सांगितले की धोंडगे परिवाराचे आणि पाटील परिवारांचे वाढ वडिलांपासूनचे स्नेहपूर्ण संबंध आहेत यावेळी आवर्जून त्यांनी आजोबा जयवंतराव पाटील यांच्या विचारांना उजाळा दिला
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी मध्ये काम करत असताना कुठल्याच कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता विश्वंभर पाटील यांनी घेतात पेशाने कारकून असले तरी शिक्षकांचे शिक्षक आपण आहात प्रामाणिकपणा हा आपल्या अंगी असलेला उत्तम गुण आहे असे मत पुरुषोत्तम भाऊ यांनी व्यक्त केले
विश्वंभर पाटील यांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा दिला
मातृतुल्य आमच्या मामी श्यामा पाटील यांच्याशी जोडलेला ऋणानुबंध सांगितला आमची माय पार्वती बाई व आजोबा जयवंतराव पाटील यांनी दिलेले संस्कार हे माझ्या जीवनाचे मुख्य आधार आहेत सर्व भाऊ बंदानी जपलेला स्नेह भाव माझ्यासाठी खूप अनमोल ठेवा आहे सर्व मित्र परिवार आप्तेष्ट या गौरव सोहळ्यासाठी आलात हे माझ्यासाठी खूप अनमोल ठेवा आहे असे मत विश्वंभर जयवंतराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले सर्व आलेल्या मान्यवरांनी विश्वंभर पाटील यांचा सत्कार केला दापशेड. येथील मा पोलीस पाटील गोविंदराव पाटील होळगे यांच्या परिवारांच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते श्री शिवाजी विद्यालय दिग्रस बु चे माजी विद्यार्थी सध्या कर्नाटक राज्यात कार्यरत असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय माधव गीते साहेब म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो शिक्षणाचा मंत्र दिला तो प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावा असे आव्हान केले
जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले पंचक्रोशीतील गावकरी आजी-माजी विद्यार्थी पावणे मंडळी पाटील परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन बी डी होनराव गुरुजींनी करून उपस्थितांचे आभार मानले (शब्दांकन; प्राचार्य संदीप पाटील होळदे)