नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला.

या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
