
जालना प्रतिनिधी – प्रदीप जाधव
जालना तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज गट ग्रामपंचायत धावेडी/थार येथे जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत परिसरात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामसेवक, सरपंच तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमामुळे परिसरात देशभक्तीचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
