सम्राट अशोक प्राथमिक शाळा, उस्माननगर येथे ‘आनंदनगरी’चे थाटामाटात उद्घाटन


मौजे उस्माननगर ( तालुका कंधार जिल्हा नांदेड : येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळा, उस्माननगर या शाळेत ‘आनंदनगरी’ उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय देवराव मल्हारराव सोनसळे व माननीय . मरगिलवार सर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून उस्माननगर केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय गादेकर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, माननीय. राहुल देवरावजी सोनसळे सर डांगे सर, राक्षसमारे सर, केशे सर, शुद्धोधन लाठकर सर, मणिषा मॅडम, प्रिया मॅडम, रोहीनी मॅडम, नगमा मॅडम, मिरा मॅडम आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला पालकवर्ग तसेच पत्रकार माननीय माणिक भिसे, पत्रकार माननीय लक्ष्मण कांबळे व माननीय शकील शेख सर यांचीही उपस्थिती लाभली.

 

‘आनंदनगरी’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढून सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि आनंदी वातावरणात शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी 

मुख्याध्यापक मा राहुल सोनसळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला


Leave a Comment

error: Content is protected !!