
जि.बुलढाणा प्रतिनिधी : शेख हसन
शेगाव तालुक्यात वंचित युवक आघाडी चा झंझावात..
गावाला विकसित करण्याचे काम युवा शाखेने करावे – जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे..
शेगाव तालुक्यात वंचित बहुजन युवक आघाडी च्या वतीने जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली तालुका अध्यक्ष उमेश इंगळे व तालुका महासचिव दीपक विरघट यांच्या नेतृत्वाखाली गावं तेथे शाखा शाखा तिथे फलक हे अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत आज दिनांक 16/2/2026 रोजी तालुक्यातील टाकळी विरो येथे ग्राम शाखा गठण व फलक अनावर कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी उद्घाटक म्हणून युवा जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख अतिथी म्हणून युवा जिल्हा उपाध्यक्ष गिरीश उमाळे, गौतम इंगळे तालुका महासचिव दीपक विरघट यांनी उपस्थिती होती.
या वेळी उद्घाटक म्हणून बोलताना अनिल भाऊ वाकोडे यांनी यांनी सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच ग्राम शाखा हे फक्त संघटन नसून गावातील समस्या निकाली काढण्याकरिता ,
ग्रामस्थांचा आवाज शासन दरबारी मांडून गावाला विकसित करण्यासाठी लढाऊ युवा सैनिकांची फौज असून गावातील प्रत्येक समूहाच्या न्यायासाठी लढा उभा करण्याचं काम युवा शाखेने करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष उमेश इंगळे होते
या वेळी सर्व नवनियुक्त शाखा पदाधिकारी. अध्यक शेषराव सावळे उपाध्यक्ष योगेश तेलगोटे
https://youtu.be/SKAAXnUMvMY?si=raTTu0d5ZLYcts1U
सचिव मिलिंद इंगळे महासचिव धम्मपाल सावळे सहसचिव प्रतीक इंगळे संघटक अमरदीप तेलगोटे सह संघटक अरुण सावळे कोषाध्यक्ष मंगेश इंगळे कार्याध्यक्ष किसन सावळे सदस्य अनिकेत शेगोकार, संदेश समदूर, गौतम वाघ
यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
या वेळी गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते