चलो बुद्ध की ओर…” – मुखेड येथील दाडेराव कुटुंबाने घेतली बौद्ध धम्माची दीक्षा



मुखेड / नांदेड :
पुर्वाश्रमीच्या धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांना मात देत, मुखेड (जि. नांदेड) येथील मातंग समाजातील दाडेराव कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेत समाजाला समतेचा संदेश दिला आहे.
दाडेराव पांडुरंग (शिक्षक), त्यांची पत्नी गोदावरी दाडेराव आणि मुलगा दिपक दाडेराव (PNB Marketing Officer) यांनी अधिकृत धर्मांतर करून बुद्ध, धम्म आणि संघाचा स्वीकार केला.
तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या सुशिक्षित कुटुंबाने नागलोक बुद्ध विहार, सिडको येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २२ प्रतिज्ञा घेत बौद्ध धम्म स्वीकारला.

यावेळी संस्थेच्या वतीने धर्मांतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी पी. एम. वाघमारे, बी. डी. कांबळे सर, नरसिंग दरबारे सर, बौद्धाचार्य महेश गजभारे, बौद्धाचार्य मनोज जमदाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.


या दीक्षेमुळे समाजात समता, बंधुता आणि मानवतेचे विचार अधिक बळकट होतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नमो बुद्धाय! जय भीम!


Leave a Comment

error: Content is protected !!