
परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन
दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी जि प प्रा शा पांडेपोखरी शाळेत माता पालक मेळावा व महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कांबळे मॅडम, श्रीमती डॉक्टर तृप्ती धुमाळ मॅडम, डॉक्टर ज्ञानेश्वर धुमाळ, श्रीमती शिंदे मॅडम, श्रीमती राजश्री सावंत मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती भागवत मॅडम,श्रीमती मुदिराज मॅडम व सर्व शिक्षक यांनी केले.मुख्याध्यापक श्री.सावंत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

काटे सर , गायकवाड सर , बादाडे सर ,काटकर सर यांनी महिलांच्या खेळाचे नियोजन केले. महिलांचे संगीत खुर्ची,बकेट मध्ये चेंडू टाकणे, माहेर सासर अशा प्रकारचे खेळ घेतले. या खेळातून महिलाना चांगल्या प्रकारे आनंद मिळाला. या कार्यक्रमाला जवळजवळ 120 च्या वर महिला उपस्थित होत्या.

शालेय व्यवस्थापन समितीने सुद्धा यात हातभार लावला. अशाप्रकारे खेडीमेडीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.