
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
कळमनुरी: कर्तव्यात कसूर, बेजबाबदारपणा व गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी त्वरित कारवाईची वंचित बहुजन आघाडीने केली मागणी, जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अध्यक्ष कळमनुरी यांना दिले लेखी तक्रारी निवेदन…!
मागण्या : 1. मागासवर्गीय महिला रुग्णास गंभीर दुखापत असताना केवळ थातूर-माथूर उपचार करून, ऍडमिट असतानाही तब्बल २४ तास कोणताही पुढील उपचार न करता तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी जाधव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
2. कर्तव्यावर असतानाही उपचार करण्यास स्पष्ट नकार देऊन बेजबाबदार वर्तन व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉ. बालाजी जाधव यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
3. सदर महिला रुग्ण ही मारहाणीच्या (क्रिमिनल) प्रकरणातील असूनही तिची वैद्यकीय नोंद योग्य प्रकारे न करणे व पोलीस प्रशासनास त्वरित माहिती न देण्यामागील कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
4. महिला रुग्णावर २४ तास उपचार न केल्यामुळे झालेल्या गंभीर निष्काळजीपणास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
5. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी जाधव यांच्याशी कॉलद्वारे संपर्क साधला असता खोटी माहिती देणे, उडवाउडवीची उत्तरे व अरेरावीची भाषा वापरणे याबाबतही योग्य ती कारवाई करण्यात यावी.
6. संबंधित दिनांकाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
तरी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन एका गरीब व मागासवर्गीय महिलेला झालेल्या त्रासास जबाबदार असलेल्या, पदाचा गैरवापर करणाऱ्या व कर्तव्यावर असूनही जबाबदारीतून पळ काढणाऱ्या डॉ. बालाजी जाधव व इतर दोषींवर दोन दिवसांच्या आत कठोर कारवाई करण्यात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम, ता.युवा महासचिव संतोष इंगोले, ता.युवा सचिव जय भीम डोंगरे, माणिक पाईकराव, दादाराव खंदारे,मनोज वाढवे, राष्ट्रपाल वाढवे ,दिनेश पाईकराव,समाधान पाईकराव, दीपक पाईकराव, किशन पाईकराव आदी कार्यकर्त्यांची उपस्थित होते.