प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे
इगतपुरी : नगर परिषद निवडणुकीत रिपब्लिकन सेनेच्या तीन नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवून पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे खालील उमेदवार विजयी झाले आहेत—अतिष मनोहर,माया गवळी, आशा भडांगे या तिन्ही विजयी नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असून त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत.

या यशामागे अहोरात्र परिश्रम घेणारे रिपब्लिकन सेना नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या निष्ठा, संघटन कौशल्य आणि समर्पणामुळेच रिपब्लिकन सेनेला इगतपुरीत हे घवघवीत यश मिळाले आहे.
पुन्हा एकदा सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन! इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरो, हीच अपेक्षा.