कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
पनवेल 21 डिसेंबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे 70 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर यांनी या प्रसंगाचा आनंद साजरा करण्यासाठी जल्लोष आयोजित केला होता. त्याप्रसंगी पनवेल महानगर अध्यक्ष तसेच महानगर कार्यकारणी तसेच कामोठे शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगरपालिकेत विजयाचा गुलाल नक्कीच उडवेल आणि पनवेल महानगरपालिकेवर वंचित ची सत्ता नक्कीच येईल अशी आशा व्यक्त केली.

त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, उपाध्यक्ष सतीश अहिरे, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, महासचिव संतोष मुजमुले, महासचिव अविनाश अडागळे , प्रवक्ते कुमार मेटांगे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण , कामोठे शहराध्यक्ष सुगंध वाळंजु , महेंद्र आसुर्डेकर, महासचिव प्रचारक सचिन गायकवाड, मुख्य संघटक सुखदेव लोखंडे , लता सोनवणे, सुनिता कुंडे, तसेच कामोठे शहर कार्यकारणी आणि पदाधिकारी उपस्थित होते.