वंचित बहुजन आघाडी, कळंबोली शहर, संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारोह संपन्न झाला.


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव 

नवी मुंबई : पनवेल 21 डिसेंबर 2025 बहुजनांचे सुसंस्कृत नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या सूचनेनुसार, वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल महानगर उपाध्यक्ष सतीश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगर क्षेत्रातील कळंबोली येथे वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

शोषित पिढीत, वंचित व उपेक्षित आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कळंबोली शहर येथे नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हे कार्यालय म्हणजे केवळ एक शक्तीकेंद्र नसुन, बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, न्याय आणि समतेसाठी संघर्ष करणारे एक महत्त्वाचे समाजचे प्रश्न व समस्या यांचे निवारण केंद्र ठरणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव संतोष मुजमुले, महासचिव अविनाश अडागळे, उपाध्यक्ष सतीश अहीरे, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, कामोठे शहराध्यक्ष, सुगंध वळंजु, महेंद्र आसुर्डेकर, महासचिव सचिन गायकवाड, कळंबोली शहराध्यक्षा ॲड.सुनीता इंगळे(खंडारे), उपाध्यक्ष भारत प्रधाने व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व समाजरत्न समाजसेवक दुर्योधन मेश्राम साहेब, भानुदास प्रधाने, अशोक प्रधाने, संतोष कसबे, दशरथ रंजवे, विशाल जाधव साहेब व सुजाता महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुनिताताई कांबळे, सुनंदाताई प्रधाने तसेच कळंबोली शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रीबिन कापून व दीपप्रज्वलन करुन कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व प्रज्ञासुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी सांगितले की, हे संपर्क कार्यालय म्हणजे जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी, त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्यासाठीचे केंद्र असेल. बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, घरकुल, अन्याय-अत्याचार अशा विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कळंबोली शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला, कामगार, शेतकरी व विद्यार्थी यांच्यासाठी हे कार्यालय खुले असून, त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा थेट पक्षापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून ते कार्य करणार आहे. तसेच सामाजिक प्रबोधन, संघटन बांधणी व लोकशाही मुल्यांची जोपासना यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेसोबत एकनिष्ठ राहुन सामाजिक परिवर्तनासाठी काम करण्याचा संकल्प केला. कळंबोली शहरातील हे संपर्क कार्यालय बहुजन चळवळीला नवी दिशा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आणि शेवटी आभार प्रदर्शन सुभाष खंडारे यांनी व्यक्त केले.


Leave a Comment

error: Content is protected !!