
पत्रकार:प्रकाश गवारे
मेंडका (भिमनगर) :
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्राट अशोका बुद्ध विहार, भिमनगर–मेंडका येथे भिमअनुयायांच्या उपस्थितीत भव्य कैंडल मार्च रॅली काढण्यात आली.

रॅलीदरम्यान “बुद्धं शरणं गच्छामि… धम्मं शरणं गच्छामि…” या पवित्र घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शांतता, करुणा आणि बंधुभावाचा संदेश देत रॅलीने गावातील प्रमुख रस्त्यांने रॅली काढण्यात आली महामानवांना अभिवादन करण्यासाठी समाजबंधूंची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. रॅलीचा समारोप सम्राट अशोका बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांतता, अनुशासन आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन…