वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेणार भेट


नांदेड : नांदेड शहरात दोनदिवसांपूर्वी झालेल्या सक्षम ताटे यांच्या हत्येनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे याची भर शहरात हत्या करण्यात आली होती.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर या उद्या 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नांदेड येथे सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देणार आहेत.

सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रियसीने त्याच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी या तरुणीच्या धाडसाला दाद दिली होती. या प्रकरणात पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.


Leave a Comment

error: Content is protected !!