
परतूर (प्रतिनिधी) : दिपक नाटभजन
परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिपट्या फिरत असल्याच्या चर्चांमुळे निर्माण झालेला भीतीचा माहोल अखेर निवळला आहे. माननीय तहसीलदार परतूर श्री. जाधव यांच्या माहितीवरून वनविभागाने तत्काळ तपास सुरू केला.

गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता वनरक्षक एम. एम. डब्ल्यू. सय्यद (काजी सर) आणि टी. आर. सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पाहणीत समोर आलेल्या तपशिलानुसार, परिसरात दिसलेला प्राणी बिपट्या नसून तडस असल्याची खात्री करण्यात आली.

यावेळी गोठ्यात बांधलेल्या गायच्या पिलावर तडसाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी घडलेली नाही.

ही घटना परतूर येथील राहुल शिवाजी काळे यांच्या गट क्रमांक 49 मधील शेतात घडली. पाहणीदरम्यान आशिष धुमाळ, विशाल काळे, आकीन पाहाडे, अमोल प्रधान, सिद्धार्थ प्रधान, महेश पाहाडे, आबा पाहाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद प्राणी दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा.
https://youtu.be/4WjQiNJQJFA?si=NPHev_IttyYsmuLh
तसेच रात्रीच्या वेळी गोठ्यांभोवती प्रकाशव्यवस्था, मजबूत कुंपण आणि निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
