
नांदेड प्रतिनिधी
नांदेड : दि 02/11/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या विजयात युवक आणि विद्यार्थ्यांचा महत्वाचा वाटा असेल.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युवा नेते सुजात आंबेडकर यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे.

नांदेडमध्ये त्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रचार यंत्रणा, बूथ बांधणी, युवक आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी, तसेच निवडणुका जिंकण्याचे महत्त्व या विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष फारूख अहमद सर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते कैलास वाघमारे, प्रशांत इंगोले अध्यक्ष भिमराव सुर्यवंशी उपाध्यक्ष अतिश ढगे उपाध्यक्ष मंगेश धोत्रे, महासचिव नागेश दुधमल ,ऋषभ महादळे, स्वप्निल गच्चे,रितेश गुळवे, अदित्य हानमंते तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
