हिथ्रो विमानतळावर कार्यरत प्रेम बिऱ्हाडे प्रकरणी अंजलीताई आंबेडकर यांची प्रतिक्रिया — “कॉलेज प्रशासनाला वंचित समूहात आलेल्या विद्यार्थ्यांचे यश पचत नाही!”



पुणे | प्रतिनिधी
हिथ्रो सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा सेवांसाठी कार्यरत असलेला आपला माजी विद्यार्थी प्रेम बिऱ्हाडे हा संपूर्ण संस्थेचा अभिमान असायला हवा होता, परंतु मॉडर्न कॉलेज प्रशासनाने त्याच्याशी केलेली दिरंगाई अक्षम्य आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

अंजलीताई म्हणाल्या आपला माजी विद्यार्थी बाहेरच्या देशात तेही हिथ्रो सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित सुरक्षा सेवांसाठी असणे, ही खरंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे.

त्यासाठी कॉलेजकडून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची तत्परता सुद्धा! प्रेम बिऱ्हाडेसाठी ही पूर्तता करण्यात मॉडर्न कॉलेजने केलेली दिरंगाई अक्षम्य आहेच पण, ह्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिका आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विट खालील प्रतिक्रिया अधिक विखारी आणि तितक्याच अगम्य आहेत.

तिथे आरक्षण नसते, केवळ मेरिटवर जॉब मिळतो ह्या त्यातील सौम्य निर्बुद्ध प्रतिक्रिया !

प्रेमला जॉब मिळालेलाच होता पण, आपल्याच वंचित समूहातून आलेल्या विद्यार्थ्यांचे यश दुर्दैवाने कॉलेज प्रशासनाला पचवता आले नाही!

हेच वास्तव आहे!

: अंजलीताई आंबेडकर
राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी


Leave a Comment

error: Content is protected !!