बारूळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक हे पद पाच महिन्यापासून रिक्त पशुपालकांची गैरसोय.



नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर

येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक कार्यरत असून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद गेल्या पाच महिन्यापासून रिक्त असून येथील पदभार चिखली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे तात्पुरता दिला आहे. त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत असून पशुंना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. बारूळ तालुका कंधार येथील दवाखाना अनेक वर्षापासून कार्यरत असून या दवाखान्या अंतर्गत आवराळ, हिस्से औराळ, नंदनवन, वळसंग वाडी ,बारूळ या गावाचा समावेश आहे.
येथे पटीबंधक कार्यरत असून पदे २ परिचारकांचे आहेत . एक पद सेवानिवृत्तीमुळे2022 पासून रिक्त असून एका पदावरील परिसर सहा महिन्यापासून वैद्यकीय रजेवर आहे. येथे दररोज दहा ते पंधरा जनावरांची ओपीडी होते. तसेच बारूळ येथे दोन गोशाळा आहेत. चिखली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना हळदा व पशुवैद्यकीय दवाखाना चिंचोली येथील पदभार आहे. त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत असून वेळेवर उपचार व सुविधा मिळत नसल्याची पशुपालकाकडून तक्रार ऐकावयास मिळत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी पशुपालकातून होत आहे


Leave a Comment

error: Content is protected !!