

ता. परतूर प्रतिनिधी :दिपक नाटभजन
बनाटे (ता. परतूर) — बनाटे येथील वंचित व गोरगरीब कुटुंबातील शेतकरी पुत्र विजय गुलाब नाटभजन यांची नुकतीच पोलीस पाटील पदावर निवड झाली असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीमुळे नाटभजन कुटुंबासह संपूर्ण समाजात आनंदाची लाट उसळली आहे. गुलाब नाटभजन यांच्या मेहनतीमुळे व प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास बसला असून गावाच्या विकासात ते मोलाची भूमिका पार पाडतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी भीमराव गायकवाड (बनाटे सर), राहुल नाटभजन, कैलास नाटभजन, विलास नाटभजन, सुभाष नाटभजन, अजय नाटभजन, करण नाटभजन आदी मान्यवरांनी गुलाब नाटभजन यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
गोरगरीब व वंचित घटकातून उभा राहिलेला हा तरुण आज पोलीस पाटील या जबाबदारीच्या पदावर निवडून येऊन समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे.




