महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत विराट महामोर्चा


कल्याण प्रतिनिधी : प्रतिनिधी प्रदीप जाधव

मुंबई : महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत आहे.

हा महामोर्चा मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मेट्रो सिनेमा येथून निघून आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाने महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या संदर्भात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे डॉ. विजय मोरे यांनी सर्व बौद्ध अनुयायी, संघटनांचे कार्यकर्ते व समर्थकांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे आणि आपला लोकशाही मार्गाने आवाज बुलंद करावा.

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या — हा आमचा हक्काचा लढा आहे, असे मत आंदोलन समितीच्या नेत्यांनी व्यक्त केले.


Leave a Comment

error: Content is protected !!