
नांदेड सिडको : सामाजिक कार्यकर्ते सम्राट भाऊ आढाव यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश – सिडको-हडको परिसरात नव्या परिवर्तनाच्या लाटेची सुरुवात!
नांदेड – सिडको-हडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सम्राट भाऊ आढाव यांनी आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे परिसरात नव्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची नांदी झाली आहे.

सम्राट भाऊ आढाव हे सिडको गुरुवार बाजार परिसरातील आंबेडकर पार्कच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे, तसेच प्रस्थापितांकडून बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला निर्भिडपणे सामोरे जाणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची मशाल घेऊन ते सतत समाजजागृतीचे कार्य करत आहेत.
त्यांच्या पक्षप्रवेशानंतर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, “हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर मनुवाद्यांच्या प्रस्थापित विचारसरणीला दिलेला एक जबरदस्त धक्का आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचा आत्मा आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे या घटनेतून स्पष्ट दिसते. शिक्षण आणि संघर्ष यानंतर आता संघटनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
सम्राट भाऊ आढाव यांच्या प्रवेशामुळे सिडको-हडको परिसरातील वंचित बहुजन आघाडीला बळ मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी परिवर्तन सोनकांबळे यांनी सांगितले –
> “मी एक भारतीय नागरिक आणि बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून सम्राट भाऊ आढाव यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या या पावलामुळे वंचित समाज अधिक संघटित होईल, आणि येणारा काळ नक्कीच वंचितांचा असेल.”
जय भीम ✊ | जय भारत | जय वंचित बहुजन आघाडी