
प्रतिनिधी धम्मानंद कांबळे
नांदेड / उस्माननगर :- भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब अआंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, उस्माननगर ता, कंधार येथील नागवंशीय मित्रमंडळाकडून उस्माननगर बसस्थानक शेजारी ग्रामपंचायत कार्यालय समोर डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बौद्धाचार्य तथा ग्रामपंचायत सदस्य अंगुलीमाल सोनसळे यांच्यासह सार्वजनिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

त्यानंतर सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी बौद्ध अनुयायांना भीम जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले मार्गदर्शन झाल्यानंतर बौद्ध

अनुयायांकडून अन्नदानाचे (खिचडी) चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स.पो.नि. संजय निलपत्रेवार, देवराव सोनसळे (संचालक), ग्रामपंचायत अधिकारी सौ.डी.ए.शिंदे , मुख्याध्यापक राहुल सोनसळे, उपसरपंच बाशीदभाई शेख ,शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसाइकर, प्रा.विजय भिसे , सामाजिक कार्यकर्ते अमिनशाह फकिर, चेअरमन रूद्र वारकड, ग्रामपंचायत सदस्य अंगुलीमाल सोनसळे ,ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे , युवा सेना उबाठा ता.प्रमुख संदिप पाटील काळम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी वामण लोंढे सर , भगवान राक्षसमारे नरेश शिंदे, पोलीस पाटील विश्वभंर मोरे, रोहीदास कांबळे, गणेश शिंदे , गंगाधर कांबळे , सम्यक कांबळे ,पत्रकार गणेश लोखंडे, पत्रकार सुर्यकांत मालीपाटील, पत्रकार लक्ष्मण कांबळे ,पत्रकार प्रदिप देशमुख,पत्रकार अमजद पठाण, संपादक बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर, गुरूनाथ माने ,शौकत अल्ली , जनाबाई कांबळे ,पोलीस मित्र उद्दव घोरबांड ,पोलीस कर्मचारी गणेश सुर्यवंशी , यांच्यासह बौद्ध उपासक, उपासिका व गावातील नागरिक

अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते, हा कार्यक्रम वशस्वी करण्यासाठी जयंतीमंडळाचे अध्यक्ष हर्ष सोनसळे ,उपाध्यक्ष सोनु पवार ,सचिव अंकुश कांबळे, धम्मानंद कांबळे, राहुल सोनसळे, माणिक सोनसळे, प्रमोद कांबळे, जिवन सोनसळे सचिन सोनसळे व उत्सव समितीचे अधिकारी, पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. सम्राट अशोक प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करूनअभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे शिक्षक भगवान रक्षसमारे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
जवाहरलाल ने. वि. वसतीगृहाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वसतीगृहाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते प्रतिमचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, विठ्ठल पाटील ताटे, सम्यक कांबळे, अमजद पठाण ,सुर्यकांत मालीपाटील, बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर, सौ. सविता कांबळे, सुप्रिया कांबळे व वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात संपादक बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, सूर्यकांत मालीपाटील, प्रदीप देशमुख, अमजद पठाण, विठ्ठल पाटील ताटे यांच्यासह अनेकांची उपस्थितीती होती.
—————————————-
दि.१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन उस्माननगर येथील बसस्थानक परीसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्यास ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचा-यांनी अभिवादन करून केले . त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर यांच्याकडून

“भारताचे सविधान उद्देशिकाचे ” बौद्ध अनुयायांना ,पत्रकार व जेष्ठ नागरिक ,महिला यांना स.पो.नि.संजय निलपत्रेवार, ग्रामपंचायत अधिकारी सौ.डी.ए.शिंदे,देवराव सोनसळे ,प्रा.विजय भिसे, रूद्र वारकड, बालाजी ईसादकर, संदीप पाटील काळम, अमिनशाह फकिर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.