आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार; डीसीपींनी स्वीकारले


औरंगाबाद (२४ ऑक्टोबर) — राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात “जन आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, हजारोंच्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा यशस्वी पार पडला.

या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य समिती सदस्य अमित भुईगल, आणि राज्य समिती सदस्य शमीभा पाटील यांनी थेट उपायुक्त (DCP) यांच्याकडे भारतीय संविधान, तिरंगा ध्वज, आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत सुपूर्द केली.

 

🟥 आरएसएसने स्वीकारण्यास नकार

 

RSS कार्यालयात या प्रती सुपूर्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, RSS प्रतिनिधींनी संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, औरंगाबादच्या DCP यांनी हे सर्व दस्तावेज स्वीकारले.

सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला.

 

अमित भुईगल यांनी भारतीय संविधान दिले.

 

शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत दिली.

या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी “भारतीय संविधान जिंदाबाद”, “RSS मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 


Leave a Comment

error: Content is protected !!