
(अहिल्यानगर) जिल्ह्यातील सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागर तरुणाला त्याच गावातील आर एस एस च्या पंधरा ते वीस गुंडानी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेऊन अमानुषपने मारहान केली, अत्यंत क्रूरपने पायावरून, हातांवरून मोटारसायकल घालून हात पाय मोडले फायटरने तोंडावर जबर मारहाण करून डोळा निकामी केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर पीडित तरुणाच्या तोंडावर शरीरावर सगळ्यांनीच लघवी करून परत अज्ञात स्थळी आणून टाकले
सध्याला पीडित तरुण अहिल्ह्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकऱ्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी तरुणाची आणि पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी फोन वर पीडित कुटुंबाचशी संपर्क करून मी भेटायाला येतो असा धीर दिला
यावेळी नगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तर चे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके आणि पदाधिकारी उपस्थित होते