
ता. कळमनुरी दिनांक 22/10/2025.मा.सूजात दादा आंबेडकर यांची होणारी 28 ओक्टोम्बर 2025 रोजी हिंगोली येथे सभा व पक्ष प्रवेश मेळाव्या नियोजन संदर्भात कळमनुरी वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने बैठक संपन्न …!
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था 2025 जिल्हा परिषद,पंचायत समिती,नंगरपालिका निवडणुकी नियोजन संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय मा.सुजातदादा आंबेडकर यांची 28 ओक्टोम्बर 2025 रोजी हिंगोली येथे जाहीर सभा व पक्ष प्रवेश मेळाव्या निमित्त उपस्थिती सभा होणार आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्याची उपस्थिती व्हावी,यासाठी कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळमनुरी शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.सदरील बैठक कळमनुरी तालुका अध्यक्ष राजु कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यांच्या तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित ठेवावी यासाठी आजपासूनच सुरुवात करून सभा यशस्वी करण्याचा निर्धार समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

सदरील बैठक कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजु कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.आजच्या बैठकीचे सूत्रसंचालन समाधान पाईकराव यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्तिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे, शिवाजी भूतनर (ता. उपाध्यक्ष सावंगी (भू.),शकील पठाण (श. अ. कळमनुरी ), संतोष इंगोले (यु. ता. महासचिव ), यशवंत नरवाडे (ता. स. कांडली ), बापूराव महाजन (स. प्र. वारंगा फा ), आनंद पाईकराव (श. महासचिव ), जितेश कदम (श. सचिव ), नागसेन वाढवे (श. संघटक ), काशिनाथ साळवे (जेष्ठ कार्यकर्ते ), मुकिंदा ढेपे (कार्यकर्ते आडा ), विनोद ढेपे (शा. अ. आडा ),नथुराम खंदारे (जेष्ठ कार्यकर्ते बऊर ), गोविंद पाईकराव (शा. अ. वाकोडी ), सुनिल खंडागळे (ता.स. वाकोडी ), सिद्धार्थ बलखंडे (जेष्ठ कार्यकर्ते रुपूर ), दिनेश पाईकराव (श. सहसचिव ), आकाश पाईकराव (कार्यकर्ते सावंगी भू.), भगवान ढेपे (जेष्ठ कार्यकर्ते आडा ),गौतम खंदारे (ग्रा. पं. स. बऊर ) मोहम्मद अस्लम (युवा कार्यकर्ते ), किशन पाईकराव (कार्यकर्ते वाकोडी ), गौतम खंदारे (कार्यकर्ते तरोडा ), अमोल पुंडगे (कळमनुरी ), विजय जोंधळे (ता. स. तरोडा ),गंगाराम मिटकर (साळवा ), दादाराव खंदारे (शा. सचिव बऊर ), अमोल खंदारे (शा. अ. बऊर ), मुकिंदा भाऊराव ढेपे (आडा ), राहुल लेंबाळे (कार्यकर्ते ) समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी, ता. कळमनुरी.जि. हिंगोली