पुणे जिल्हा गुणवत्ता संवर्धन अभियानात बाबीर विद्यालय अव्वल


प्रतिनिधी : सागर लोंढे

“पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात श्री बाबीर विद्यालय रुई ता. इंदापूर या विद्यालयाने इ. 5वी ते 10वी गटात पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथम येण्याचा मान पटकवला आहे . याचे सर्व श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि अथक परिश्रम करणारे शिक्षक यांना जाते.हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, जिल्हा संघाचे विश्वस्त अरुण थोरात, शिवाजीराव किलकिले विविध संस्थेचे पदाधिकारी, यावेळी डॉ.महेश पालकर म्हणाले की विद्यार्थी विकासाचा ध्यास प्रत्येक शिक्षकांकडे असणे गरजेचे आहे . इयत्ता ६ वी व ९ वी वर्गांसाठी उपचारात्मक अध्ययन करावे . आसर , नास , परख , निपुण सर्वेक्षणाचे अवलोकन करून विद्यार्थी गुणवत्ता वाढीस प्रेरणा देणारे पुणे जिल्हा गुणवत्ता संवर्धन अभियान राज्यास दिशादर्शक आहे , ” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.महेश पालकर यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 2203 पैंकी 1620 माध्यमिक शाळांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी शहर व ग्रामिण विभागात चार गटामध्ये तपासणी करण्यात आली. यामध्ये तालुकास्तरीय २२३,विशेष प्राविण्य २० जिल्हास्तरावर २५ शाळांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले .

पुणे विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे म्हणाले , ” शालेय स्तरावर विद्यार्थी लेखन , वाचन कौशल्य सुधारणे महत्त्वाचे आहे. इयत्ता पहिली वर्गास प्रज्ञावान शिक्षक नियुक्ती करावी . मूलभूत क्रियांवर काम पार पाडल्यास पुढील शिक्षण सुकर होते . “

मार्गदर्शनपर भाषणात शिक्षणाधिकारी डॉ.

भाऊसाहेब कारेकर , ” म्हणाले पुणे जिल्हा हा गुणवत्ता उपक्रमात सदैव अग्रणी जिल्हा आहे . या अभियानातून शाळांची तपासणी झाली ही कौतुकास्पद बाब आहे .पुरस्कार प्राप्त शाळांचा हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे .

 गुणवत्ता संवर्धन अभियानचे सादरीकरण राज्यात स्वीकारले गेले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. “

यावेळी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांचा आढावा घेतला . शिक्षक – शिक्षकेतर भरती , वेतनेतर अनुदान , जुनी पेंशन योजना , टप्पा अनुदान , शालेय पोषण आहार यंत्रणा , प्रशासकीय कामे यासंदर्भात शासनाने सकारात्मक पाऊले उचलावीत असे विचार व्यक्त केले . हा पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेच्या वतीने यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष अमरसिंह पाटील व रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील यांनी अभिनंदन केले तसेंच रुई गावाच्या आसपासच्या परिसरातून या यशाबद्दल विद्यालयाचे कौतुक होत आहे.

 पुणे येथील कार्यक्रमाप्रसंगी श्री बाबीर विद्यालयाचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,,विदया सहसचिव तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील,सहखजिनदार गणेश घोरपडे,विभागीय अध्यक्ष रामराव पाडुळे तसेच जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले,हरिश्चंद्र गायकवाड, राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त मुख्याध्यापक कुंडलीक मेमाणे ,तसेच राज्य सचिव नंदकुमार सागर इ.मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास जिल्हाभरातून साडेतीन हजार पेक्षा जास्त मुख्याध्यापक, संस्थाचालक,श्री बाबीर विद्यालयाचे पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!