
मुदखेड | प्रतिनिधी : प्रकाश गवारे
त्यागमूर्ती, कोट्यवधी लेकरांची आई माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरात मोठ्या हर्षोल्हासात व शांततेच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध सलामी देत माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष, नगरसेवक, शासकीय व निमशासकीय विविध विभागातील,क्षेत्रातील मान्यवर, तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बोध्द उपासक -लहान बालक प्रमुख पाहूने उपस्थित होते.
हा कार्यक्रम महामाया महिला मंडळ, भीमनगर;माता रमाई महिला मंडळ, अशोका नगर; लिंबुनी नगर; सिद्धार्थ नगर; नवी आबादी महिला मंडळ, समता नगर महीला मंडळ, रेल्वे कॉलनी महीला मंडळ आदी महिला मंडळांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
यानंतर शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने दिव्य-भव्य महारॅली काढण्यात आली. रॅलीत माता रमाई आंबेडकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, पारंपरिक वेशभूषा आणि लेझीम पथकाचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. रॅलीदरम्यान महात्मा फुले यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ही रॅली भीमनगर येथे पोहोचल्यानंतर भंतेजी शिलरत्न व भंतेजी गगन बौद्धी यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धम्म ध्वज गाथा घेण्यात आली व उपस्थितांनी सलामी दिली. त्यानंतर खीरदान वाटप करण्यात आले.

रॅली पुढे माता रमाई आंबेडकर चौक येथे पोहोचल्यावर माता रमाई आंबेडकर यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुदखेड पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी धिरज चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जात सम्राट अशोक चौक यांच्या नामफलाच्या पाटीचे अनावरण करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शहरातील गावातील प्रमुख पोलीस स्टेशन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व श्री

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.व अभिवादन केले.पुढे रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व धम्म ध्वज गाथा घेण्यात आली.
यानंतर लेझीम पथकाचे सादरीकरण झाले. रॅली पुनः बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, बुद्ध विहार येथे आल्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला. भीमनगर येथे सर्व उपस्थित जनसमुदायाच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, शांततेत व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी समता सैनिक दल यांचे विशेष आकर्षण व सहकार्य लाभले…!
https://www.facebook.com/share/v/1JUjx85iW1/