कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजू भाऊ कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अद्यापही न सापडल्यामुळे धरणे आंदोलन, उपविभागीय अधिकारी,यांना देण्यात आले निवेदन…!
कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजू भाऊ कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यास दिड महिने झाले असून अद्यापही हल्लेखोर सापडले नाहीत.वरील संदर्भ 01 नुसार पोलीस उपमहानिरीक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड येथे आंदोलन करून सुद्धा व त्या आंदोलनात विविध मागण्या करून सुद्धा अद्यापही कोणतीही मागणी मंजूर करण्यात आली नाही किंवा त्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतेहि उत्तर देखील प्राप्त झाले नाही,एवढ्या मोठ्या प्रकरणात स्पष्ट पोलिस प्रशासनाचा निष्काळजीपणा व अत्यंत ढिसाळ कारभार आम्हास दिसून येत आहे.

अद्यापही हल्लेखोर न सापडल्यामुळे व आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळे दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी , वेळ सकाळी 11:00 वाजता ,ठिकाण उपविभागीय,तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे वंचित बहुजन आघाडी यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी कळमनुरी यांना धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले …!
यावेळी निवेदनकर्ते माथाडी कामगार प्रेरित वंचित बहुजन आघाडी प्रभारी जिल्हा अध्यक्ष बाबारावजी थोरात, कळमनुरी युवा ता.अध्यक्ष मोहम्मद असलम, लंकेश आवटे ( सम्मेक वी.आ. जि.उपाध्यक्ष), दिनेश पाईकराव ( युवा ता.महासचिव),ज्येष्ठ कार्यकर्ते विनोद भाऊ थोरात,जयभीम डोंगरे (युवा ता.सचिव),दीपक सोनाळे ( युवा ता.उपाध्यक्ष),करण नरवाडे ( शाखा अध्यक्ष,दाती), धम्मपाल पाईकराव,( शाखा अध्यक्ष,दाती), विनोद ढेपे ( शाखा अध्यक्ष, आडा),दादाराव खंदारे ( शाखा सचिव, बऊर),कार्यकर्ते जितेश कदम,भगवान दादा ढेपे,समाधान पाईकराव,गोविंद पाईकराव,सचिन हाटकर,शीलवान नरवाडे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी, ता.कळमनुरी जि.हिंगोली